ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरचा अपघात

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही काहीही इजा झालेली नाही. सुषमा अंधारे आणि हेलिकॉप्टरचा पायलेट दोघेही सुरक्षित आहेत.

हे हेलिकॉप्टर नेमकं कशामुळे क्रॅश झालं याची माहिती समोर आलेली नाही.

अपघात झाला तेव्हा सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झालं. गेल्या 2 दिवसांपासून सुषमा अंधारे ठाकरे गटाचे रायगडमधील उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गितेंच्या प्रचारासाठी रायगड दौऱ्यावर आहेत.

आज आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरने मुरुडला जाणार होत्या. त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमधील एका मैदानात उतरत असताना त्याचा अपघात झाला. जमीनीपासून काही फुटांवर असतानाच हेलिकॉप्टरवरील पायलटचं नियंत्रण सुटलं आणि ते खाली पडलं. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान झालं आहे. धुळीचे लोट उडाल्याने हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं प्राथमिक कारण सांगितलं जात आहे.

हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हेलिकॉप्टर हळूहळू मैदानाच्या दिशेने खाली येताना दिसत आहे. हे हेलिकॉप्टर जसजसं जमीनीच्या जवळ येतं त्याप्रमाणे मैदानावरील मातीमुळे धुळीचे लोट उठू लागतात. याच धुळीच्या लोटांमुळे हेलिकॉप्टर जमीनीपासून काही अंतरावर असताना खाली कोसळते आणि धुळीचे लोट अधिक जास्त प्रमाणात दिसू लागतात.

सामान्यपणे हेलिकॉप्टर उतरवलं जातं अशा ठिकाणी खास करुन मैदानांमध्ये आधी पाणी फिरवालं जातं. हेलिकॉप्टर उतरताना त्याच्या पंखांमुळे मोठ्याप्रमाणात माती आणि धूळ उडण्याची शक्यात असते. मात्र महाडमध्ये ही दुर्घटना घडली त्यावेळी पाणी फावरण्यात आलं नव्हतं असं सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे.

धुळीच्या लोटांमुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं प्राथमिक कारण समोर येत असलं तरी नेमका हा अपघात कशामुळे झाला याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं समजतं. कमी उंचीवरुन हे हेलिकॉप्टर अगदी जमिनी लगत असताना पडल्याने विमानातील पायलेटबरोबरच कोणालाही कोणतीही इजा झाली नाही.

मात्र अशाप्रकारे अपघात घडण्यासाठी स्थानिक प्रशासन जबाबदार आहे की इतर काही कारणं आहेत याचा शोध घेतला जाणार आहे. सुषमा अंधारे यांचा आजचा नियोजित दौरा कायम राहील अशी प्रथमिक माहिती समोर येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे