ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार – चेअरमन चंद्रशेखर घुले

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार असून त्या दृष्टीने बँकेचा सेवक हा प्रशिक्षित होणे गरजेचे असल्याने जिल्हा बँकेने सेवकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बॅकेंचे सोने तारण कर्जावरील व्याजदर इतर बॅकांच्या तुलनेत कमी असून आता सेवकांनी टार्गेट ओरिएंट काम करण्याच्या दृष्टीने कामकाज करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चेअरमन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.

जिल्हा बँकेला मोठा इतिहास असून बँकेची परंपरा अतिशय उज्वल आहे. बँकेने नेहमीच शेतकरी, ग्राहकांच्या आणि सभासदांच्या हिताचे दृष्टीने कामकाज केले आहे असेही घुलेपाटील या प्रसंगी म्हाणाले.

बँकेच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सभागृहामध्ये बँकेचे जिल्ह्यातील शाखांतील सेवकांकरता सोने तपासणी व त्या संदर्भात आणि अडचणी संदर्भातील प्रशिक्षण वर्गप्रसंगी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील बोलत होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी या प्रशिक्षण वर्गाचे महत्त्व विशद करून बँकेचे सेवक निश्चित प्रमाणे सोने तारण व्यवसाय वाढवतील अशी ग्वाही वर्पे यांनी दिली.

याप्रसंगी जिल्ह्यातील तालुका विकास अधिकारी व सेवकांच्या वतीने बँकेच्या चेअरमन पदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर सर्वश्री जयंत देशमुख, राजेंद्र शेळके, सुरेश पाटील, संजय बर्डे, मॅनेजर व सेवकवृंद हजर होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे