ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जाहीर निषेध- शरद क्यादर व त्यांच्या साथीदार लक्ष्मण बुरा यांचा जाहीर निषेध

अहमदनगर

पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय भगवंताचे बदनामी करणारी बातमी टाकल्याबद्दल शरद लिंगप्पा क्यादर आणि लक्ष्मण नरसय्या बुरा यांचा जाहीर निषेध.

आम्ही श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्टचे सर्व ट्रस्टी व सर्व पद्मशाली बांधव व समाजातील इतर सामाजिक संस्थांच्या सहाय्याने व सर्वांना विश्वासात घेऊन मंदिर परिसरातील जीर्ण जीर्ण झालेले बांधकाम पाडून नवीन बांधकाम करणे व पद्मशाली पुरोहित संघाच्या मार्गदर्शनाखाली भग्न झालेल्या मुर्त्याचे विधीवत पूजन करून विसर्जित करण्याचे नियोजन आहे.

मंदिराचे नव्याने बांधकाम झाले नंतर या सर्व मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना व बांधकाम सर्वांच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. मंदिर जवळ जवळ 102 वर्ष जूने आहे ट्रस्ट बद्दल च्या वादामुळे या मंदिराची दुरावस्था झाली होती. त्यामुळे मंदिर परिसरातील बांधकाम करणे आवश्यक होते अन्यथा बांधकाम कधीही पडू शकत होते. मध्यंतरी नारळी पौर्णमेच्या दिवशी येथील एक भाग कोसळला सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

मंदिर परिसरामध्ये प्राचार्य बत्तीन पोट्यांन्ना प्राथमिक विद्यालय व श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भरते या ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक झाले होते.

सभा मंडप उतरवून घेण्यासाठी अहिल्यानगर म न पा ने वेळोवेळी सूचना केल्या होत्या त्यामुळे त्वरित सर्व समाजाची व ट्रस्टींची मीटिंग घेतली यामध्ये सर्वांची एकच मागणी होती की ,मंदिराचे जीर्ण झालेला भाग त्वरित काढून घेऊन तो नव्याने बनवावे व मंदिर जवळजवळ शंभर वर्षे पूर्ण झालेले आहे यातील अनेक मुर्त्यांचे व्यवस्थित राखण न झाल्याने त्या भग्न पावले आहेत त्याची विधिवत पूजा करून विसर्जन करून बांधकाम पश्चात पुन्हा नव्याने मुर्त्या आणून त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून या मंदिराचे व मंदिरातील इतर भागाचे जीर्णोद्धार करणे आवश्यक आहे.

त्यानुसार या ठिकाणी आम्ही काळजीवाहू ट्रस्टी म्हणून व समाजातील इतर सर्व आजी-माजी ट्रस्टी व समाजातील जेष्ठ व सर्वांना सोबत घेऊन या मंदिराचे व मंदिराच्या परिसरातील पावित्र्य राखून सर्व विधिवत पूजा करून सर्वांना सोबत घेऊन सर्व कार्य सुरू आहे.

यात कुठल्याही प्रकारची विटंबना होईल किंवा कोणाचे मन दुखेल असे कुठलेही कार्य केलेले नसून याबाबत वेळोवेळी सर्व समाजाची व ट्रस्टींची मीटिंग घेऊन या सर्व प्रक्रियेची अंमलबजावणी करत आलेलो आहोत .

शरद लिंगप्पा क्यादर ही व्यक्ती अनेक दशकांपासून या मंदिर बांधकामा विरोधात असतात ट्रस्टींच्या विरोधात मंदिर बांधकाम करताना अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी वेळोवेळी केलेला आहे शरद लिंगप्पा क्यादर ही व्यक्ती समाजात व इतर ठिकाणी चुकीची माहिती पोहोचवत आहे व सर्वांची दिशाभूल करत आहेत खोटी तक्रार देऊन प्रशासनाची सुद्धा दिशाभूल करत आहेत आता सध्या त्यांच्यासोबत लक्ष्मण नरसय्या बुरा ही व्यक्ती सुद्धा जोडली गेलेली आहे .

या दोन्ही व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःच्या हट्टापायी या सर्व गोष्टी करत असतात हे त्यांचे नेहमीचेच आहे. हे दोन जण सोशल श्री मार्कंडेय मंदिर बाबत खोटी माहिती सोशल मीडियावर टाकून व इतर ठिकाणी पत्रकबाजी करून पद्मशाली समाजाची सर्व मार्कंडेय भक्तांची व प्रशासनाची दिशाभूल करत आहे.

त्यामुळे आम्ही लवकरच या दोघांवर खोट्या तक्रारी बाबत व शहरात असंतोष निर्माण होइल अशी परिस्थिती निर्माण करण्यावर कायदेशीर कारवाई करून याच्या विरोधात आंदोलन करणार आहे.

श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सचिव व सहसचिव…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे