ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर जिल्हा परिषदेत डीएड व बीएड पात्रताधारक उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावर भरती

अहमदनगर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड व बीएड पात्रताधारक उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अर्ज मागविले आहेत. जिल्ह्यात सुमारे 70 ते 80 शिक्षकांची मानधनावर नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या किती शाळा आहेत, याची माहिती देखील मागविली आहे. तसेच पात्रताधारक डीएड व बीएड उमेदवारांकडूनही अर्ज मागविले आहेत. खुल्या वर्गासाठी 18 ते 38 वर्षे वयोगटांतील उमेदवार पात्र आहेत.

मागासवर्गीयांमध्ये वयोमर्यादा 43 वर्षांपर्यंत पात्र असेल. ज्या शाळेत नियुक्ती होणार असेल, तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील. त्यानंतर, तालुका व जिल्हा या अनुक्रमाने प्राधान्य दिले जाणार आहे. ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. तिला मुदतवाढीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल. नियुक्त उमेदवारांना प्रतिमहिना 15 हजार रूपये मानधन मिळेल. या पदावर कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त होणार आहे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील यांनी ही माहिती दिली.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे