ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज

सोलापूर

लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणाऱ्या रकमेचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारणी, बचतगटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून परतावे किंवा म्हातारपणाची पेन्शनचे नियोजनापर्यंत अनेक संधी महिलांसमोर आहेत. ही रक्कम महिलांचे अर्थकारण सक्षम करण्याची उत्तम संधी असू शकते.

लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रकमेचे काय करायचे असा प्रश्न महिलांसमोर आहे. आर्थिक साक्षरतेअभावी या रकमेच्या वापरातून उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण न होता ही रक्कम घरखर्चात वापरली जात आहे. प्रत्यक्षात या रकमेतून कर्जाची पत मिळून एखादा व्यवसाय उभा राहू शकतो.सआयपीमध्ये महिलांची सर्वाधिक गुंतवणूक आहे. कारण ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

या गुंतवणुकीत वार्षिक परतावा (एसडब्ल्यूपी- सिस्टमॅटीक विथड्रॉल प्लान) आयुष्यभरासाठी मिळवता येतो.तसेच गुंतवलेल्या रकमेची मार्केट व्हॅल्यू देखील वाढत जाते.

विशेष म्हणजे हे मासिक मानधनात १५०० रुपयांची भर घालून जर ३ हजार रुपये करून सीपमध्ये गुंतवले तर महिन्याला १२०० रुपये आयुष्यभरासाठी मिळतात. म्हणजे लाडकी बहिण योजनेएवढी मासिक रक्कम स्वतःच्या गुंतवणुकीवर मिळू शकते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे