हे विश्वची माझे घर अतिशय सुंदर असा लेख
हिरकणी सौ.अनिता गुजर राहणार डोंबिवली

हे विश्वची माझे घर हा विशाल व भव्य दृष्टीकोन आहे. आपल्या कुटुंबा पुरते मर्यादित न रहाता सारे विश्व कुटुंब असून आपण त्यातले एक आहोत ह्या उद्दात हेतूने जीवन जगले पाहिजे.आपल्यालाही सर्वांबरोबर रहावे असे वाटते .
सर्व पशु, पक्षी एकत्र कळपाने राहतात, कारण त्यात एक प्रकारची सुरक्षितता असते. एकटेपण म्हणजे भीतीचे घर असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेमाशिवाय जगणे शक्य नाही. प्रेम ही माणसाची प्रथम गरज आहे. भावनात्मक सुरक्षितता प्रेमातच मिळते.
जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट प्रेम आहे. प्रेम म्हणजे आनंद, म्हणून प्रेम देतं व घेतं, सर्वांनी साथीने जीवन यात्रा करायची असते.निसर्गाकडे पहिले तर सारे एकमेकाच्या सहवासात असतात. पाखरे झाडांवर रहातात, पाण्यात मासे इतर प्राणी रहातात, फुलांवर फुल पाखरे आनंदाने बागडतात. चंद्र, सूर्य, वारा, पाऊस, पृथ्वी साऱ्यांचे पालन पोषण करतात, हा निसर्ग आपल्या सर्वांसाठी आहे. त्याच्या कुशीतच आपण वाढतो, जगतो. विश्वात सहजीवन आहे प्रेम आहे म्हणून आनंद आहे. एकटेपणात दु:ख आहे म्हणून हे विश्वची माझे घर या विशाल हृदयाने, सर्वाना सामावून घेतले पाहिजे.
सर्वाना आपल्या बरोबर घेऊन चालायचे आहे. त्यातच सार्थकता आहे. निसर्ग, पशु, पक्षी सर्व स्वधर्माप्रमाणे रहातात. माणसाने पण स्वधर्म पाळावा. माणसाचा धर्म आहे माणुसकी. सर्वाना आपलेसे करत आपल्या बरोबर घेऊन जीवनाच प्रवास करावा.सर्वांच्या संगतीने जाणे म्हणजेच मी पणाचा त्याग करणे. जेथे मी संपतो तेथे दुसर्यांचा विचार सुरु होतो. त्यामुळे सर्वांच्या संगतीने जेथून आलो तेथे परत जाणे हेच सार्थ जीवन आहे, हो ना?….
प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात यशाचं सर्वाेच्च शिखर गाठावं, असं ध्येय असतं. तर काहीजण खरोखरच यशाचं शिखर गाठतात. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर प्रत्येकाला यश मिळेलच असंही नाही. पण जो खरा प्रयत्न करतो त्याला यश हे मिळतंच. यश हे जरी आपल्याला आपण केलेल्या कृतीमुळे मिळतं, हे खरं असलं तरी सकारात्मक विचारांचा आपल्यावर नेहमी चांगलाच परिणाम होतो.
त्यामुळे यशाच्या मार्गावर अनेक दिग्गजांचे विचार आपल्याला यश मिळवण्याच्या प्रवासात नेहमी प्रेरणा देतात आणि अपयश आलं तरी पुढे जाण्याची दिशा दाखवतात हे ही तितकेच खरे, हो ना?….