अहिल्यादेवींचे विचार व कार्य अहिल्यानगरीत प्रत्यक्षात आणण्यासासाठी काम करू – महेंद्र गंधे
अहिल्यानगर

आसेतु हिमालय काम करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांनी आयुष्यभर संघर्ष करत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा पूर्ण भारतभर फडकवला. सर्वसामान्यांना न्याय व हक्क मिळवून दिला. आपल्या शहराचे नामांतर महान कर्तृत्ववान अहिल्यादेवींच्या नावाने झाले आहे, हे आपले भाग्य आहे. त्यामुळे अहिल्यानगरीत त्यांच्या विचार व कार्य प्रत्यक्षात आणण्यासासाठी काम करू, असे प्रतिपादन शहर भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० या जयंतीनिमित्त शहर भाजपच्या वतीने सावेडी उपनगरात झालेल्या कार्यक्रमात महेंद्र गंधे यांनी अहिल्यादिवेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते गोकुळ काळे, शिवसेना नेते रावजी नांगरे, रविंद्र काकणे, मेजर जपे, बाळासाहेब तागड, सुनिल पांडुळे, ओम काळे, सिध्देश नाकाडे, अभिषेक वराळे, अक्षय पावडे, तेजस धुळेकर, बीजेपी विंग्ज ॲपचे महाराष्ट्राचे संयोजक मल्हार गंधे, सुमित बटुळे, बाळासाहेब पाटोळे, लक्ष्मिकांत तिवारी, शरद बारस्कर,ॲड.ऋग्वेद गंधे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.