ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

महिलांचे कर्तृत्व आणि माझ्यातील मी पणा सिध्द करायचे असेल तर महिलांनी व्यवसाय करावा – पद्मश्री व रॅमन मॅगासेसे पुरस्कार प्राप्त श्रीमती नीलिमा मिश्रा.

मांडवगण- ता. - श्रीगोंदा

महिलांचे कर्तृत्व आणि माझ्यातील मी पणा सिध्द करायचे असेल तर महिलांनी व्यवसाय करावा – पद्मश्री व रॅमन मॅगासेसे पुरस्कार प्राप्त श्रीमती नीलिमा मिश्रा.

चैतन्य महिला बचत गटाची सहकारी पतसंस्था मर्या. अहमदनगर. “महिला सरपंच गौरवसोहळा व व्यवसाय मार्गदर्शन शिबीर “

प्रास्ताविक चैतन्य महिला बचत गट पतसंस्थाच्या चेअरमन मेघना गावडे यांनी केले. या प्रास्ताविक मध्ये त्यांनी गटाची पतसंस्था कशी काम करते, व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन शिबिरा मागचा हेतू स्पष्ट केला.

तसेच चैतन्य महिला फाऊंडेशन चे सचिव शरद गावडे यांनी या संस्थेची स्थापना संकल्पना मांडली.

प्रस्तावना मधून श्री. शरद गावडे चैतन्य महिला बचत गटाच्या कामा विषयी माहिती सांगितली. जिल्हा सहकारी पतसंस्थेने जिल्ह्यातील ग्रामीण भागात सामजिक, राजकीय, महिला सबलीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट महिला सरपंचांचा गौरव सोहळा व बचत गटातील महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन सत्राचे रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा. आयोजन केले होते.

महिलांचे आर्थिक सबलिकरण व्हावे, हा हेतू मनात ठेवून संस्थापक श्री. विठ्ठलराव वाडगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी २०२० मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली.

यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून श्रीमती निलीमा मिश्रा – पद्मश्री व रॅमन मॅगासेसे पुरस्कार प्राप्त, लाखो महिलांना गोधडीच्या माध्यमातून मिळवून दिला रोजगार.अध्यक्षस्थानी तनुजा लिपणे,  प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक,सौ. रजनीताई देशमुख मा. सभापती , श्रीमती भक्ती काळे ,सहाय्यक आयुक्त (राज्यकर), अ.नगर , श्री. अनिल गावडे संचालक, स्नेहालय, अहमदनगर, डॉ. किसन घोरसड पाटील एम.डी., उद्योगपती भारत प्रा. लि.हे सर्व पाहुणे उपस्थित होते.

निलिमा ताई यांच्या भाषणात सांगितले की यांनी लाखो महिलांना व्यवसाय चालू करण्यासाठी आणि स्वतः च्या पाया वर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देतात व त्याच सोबत रोजगार ही देतात. त्यांनी आत्ता पर्यंत लाखो महिलांना गोधडी शिवण्याचे काम आणि प्रशिक्षण दिले आहे.

हाताने शिवलेल्या तसेच मशिन च्या गोधडींची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर परदेशात ही आहे. त्या दिवसाला ३०० – ५०० महिला काम करून गोधडी सोबत बेडशीट, लॅपटॉप बॅग, ड्रेस, ब्लाऊज, पेटीकोट ची काम करून स्वतः चे घर चालवतात. आणि अभिमानाने सांगतात की आम्ही घर सांभाळून आमचा व्यवसाय करतो. या व्यवसायातून आम्ही लोन घेऊन घर, मुलींची लग्न, शेती साठी लागणारे साहित्य, मशिन घेतली. आणि आम्ही आनंदी आहोत.

यानंतर अनुमोदन सौ. राऊत मॅडम यांनी केले.

डॉ. किसन घोरसड पाटील एम.डी. उद्योगपती भारत प्रा. लि.यांनी व्यवसाय मार्गदर्शन केले. यामध्ये सरकारी योजना काय आहे, कसे मिळते, कुठे मिळेल,त्याचा फायदा कसा होईल, किती सबसिडी मिळेल याची संपूर्ण माहिती महिलांना दिली.तसेच त्यांनी निवडक महिला बचत गटांचा सत्कार केला.

भक्ती ताई काळे सहाय्यक आयुक्त (राज्यकर), अ.नगर .अर्थार्जन कसे करावे, महिलांनी पुढे यायलाच पाहिजे.

श्री. अनिल गावडे संचालक, स्नेहालय, अहमदनगर. चैतन्य या संस्थेच्या माध्यमातून ग्रामिण व शहरी भागातील महिलांना व्यावसायिक गरजांसाठी कर्ज वितरण केले जाते. आजअखेर संस्थेने ४५० बचत गटांना सुमारे ६ कोटींचे कर्ज वितरण करून महिला सबलिकरणात मोलाचे योगदान दिले आहे.असे सांगितले.

शेतीपूरक व्यवसाय, लघुयोग, मासेमारी, गृहोपयोगी वस्तू निर्मिती, लोणचे, पापड उद्योग, महिलांनीच चालवलेले भोजनालय आदी व्यवसायांसाठी संस्थेने आर्थिक पाठबळ व त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देऊन महिलांना जगण्याची नवी उमेद निर्माण केली आहे.

या कार्यक्रमास ४०० ते ५०० महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. तसेच इतर संचालक मंडळ सौ. सुलभा सदाफुले, सौ. रुख्मिनीताई वाडगे, सौ. संगीता दुतारे, सौ. स्वातीताई फुलारे, सौ. आरती तागड, सौ. सुनिता वांढेकर, सौ. गौरीताई भोस, सौ. तनुजा लिपणे, सौ. राणी वामन, सौ. प्रियंका डफळ कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये महिला सरपंच व महिला बचत गट यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वृध्देश्वर मल्टिस्टेट पतसंस्था आणि चैतन्य महिला बचत गट पतसंस्था च्या स्टाफ नी खुप मेहनत घेतली त्यामुळे त्यांचे ही आभार मानले.

शेवटी चहा नाश्ता करून कार्यक्रमाची सांगता झाली.

आभार प्रदर्शन रामचंद्र म्हस्के यांनी केले.

तसेच या कार्यक्रमाच्या मिडिया पार्टनर म्हणून AR न्यूज मिडिया च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन-बोज्जा या ही उपस्थित होत्या.

AR न्यूज हे एकमेव न्यूज मिडिया चॅनल आहे की ते फक्त महिलांसाठी काम करत आहे. त्या सोबत च ते इतर ही लोकल किंवा सर्व घडामोडी बातम्या कव्हर करतात.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे