ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीचे आयोजन

पुणे

वैशाख शु. ३, (अक्षयतृतीया) म्हणजेच दि. १० मे २०२४ रोजी जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसेच श्री श्री श्री जगदगुरु एकोरामाराध्य आणि चैत्र शुद्ध पंचमीला श्री श्री श्री जगदगुरु मरूळाराध्य यांचा प्रकट दिन अश्या त्रिवेणी संगमाचे औचित्त्य साधून “हिंदू वीरशैव लिंगायत मंच” या वीरशैव लिंगायत समाजात कार्य करणाऱ्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने “महात्मा बसवेश्वर जयंती” चे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु वीरशैव लिंगायत मंचाच्या पुणे महानगर शाखे तर्फे पुणे शहरातील बाजीराव रास्ता, महाराणा प्रताप उद्यान येथे सकाळी ८ वा पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल, तसेच शंखनाद पथकातर्फे १०० शंखांचा नाद करुन म. बसवेश्वरांना मानवंदना देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी उद्योजक मा. श्री. रविजी कल्याणे हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

हिंदू वीरशैव लिंगायत मंचातर्फे समस्त वीरशैव लिंगायत समाज आणि सर्व हिंदु बांधवांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कळावे,

ऍड. वैजयनाथ विंचूरकर

माध्यम प्रमुख

हिंदु वीरशैव लिंगायत मंच

 प.महाराष्ट्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे