ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक…. अहमदनगर शहरातून ७० लाखांची रोकड जप्त

स्थानिक गुन्हा शाखेने अहमदनगर शहरामध्ये छापा मारुन 73 लक्ष 24 हजार 500 रुपयांची रक्कम जप्त केली होती. यापैकी 69 लक्ष 44 हजार 500 रुपये एवढ्या रक्कमेचे योग्य स्पष्टीकरणे न मिळाल्याने ही रक्कम आयकर विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली असुन उर्वरित 3 लक्ष 80 हजार रुपयांची रक्कम योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने कृष्णा विजय भगत, बोल्हेगाव यांना सुपूर्द करण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा वित्त अधिकारी तथा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अहमदनगर शहरामध्ये 21 मार्च, 2024 रोजी छापा टाकुन रक्कम जप्त करण्यात आली होती.

जिल्हा तक्रार निवारण समितीने आयकर विभागाला चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आयकर विभागाने दिलेल्या अहवालानुसार ही कार्यवाही करण्यात आली असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे