महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघंही स्ट्रिट प्रीमियर लीगच्या फायनल्सना गुरुवारी ठाण्यात उपस्थित होते. दादोजी कोंडदेव मैदान या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली.
आता अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळी सहा वाजता मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे. जनसत्ताने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
भास्कर डॉट.कॉम ने दिलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना आज सकाळी ६ च्या सुमारास कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी पार पडली. अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी पार पडली का? हे अद्याप बच्चन कुटुंबापैकी कुणीही सांगितलेलं नाही.