ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर महानगरपालिकेत १३४ पदांची भरती ,तब्बल १८ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात भरती होणार

अहमदनगर प्रतिनिधी

महापालिकेत १३४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

कंपनीसोबत मनपाची करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आस्थापना विभागप्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले. मनपात तब्बल १८ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.

आस्थापना खर्च वाढल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मनपात नवीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. गेल्या सहा ते सात वर्षात अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे सर्वच विभागांत मनुष्यबळाची कमतरता आहे.

एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार विभागांचा पदभार आहे. त्यामुळे अनेक कामे रखडून नागरिकांचीही गैरसोय होते. मनपात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शासनाकडे किमान आवश्यक ती पदे भरती करण्यास मंजुरी द्यावी, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर आता टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

मनपाच्या आकृतिबंधात मंजूर पदे २८७० इतकी आहेत. प्रत्यक्षात कार्यरत अवघे १६०० आहेत.

आता नव्याने भरती करण्यात येणाच्या पदांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, भूजलतज्ज्ञ, पर्यावरण संवर्धन अधिकारी, कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहायक, आरेखक, संगणक प्रोग्रॅमर, विद्युत पर्यवेक्षक, पाणी लॅब टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लघु टंकलेखक, कनिष्ठ विधी अधिकारी, समाजविकास अधिकारी, सॅनिटरी सबइन्स्पेक्टर, फायरमन, लिपिक, टंकलेखक आदी संवर्गातील पदे भरली जाणार आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे