ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाने घेतला मोठा निर्णय ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या

अहमदनगर

नगर महापालिकेने शहरातील सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या ९०१ पैकी तब्बल २४४ शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. त्या जागी नव्याने कर्मचारी नियुक्त केले आहेत.

त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना बुधवारी (२४ जानेवारी) पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागले. मनपा शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले. सर्वेक्षणाच्या कामाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला. आता दुसऱ्या दिवशी नव्याने २४४ जणांच्या नियुक्त्या केल्याने त्यांचेही दोन दिवस वाया गेले आहेत.

शहरातील सुमारे एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक असे ९०१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचा समावेश आहे. कर्मचारी नियुक्त करण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून खासगी शाळांच्या शिक्षकांची नावे मागवण्यात आली होती.

एका शाळेतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षक यादीत घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या यादीत एकाच शाळेतील बहुसंख्य शिक्षकांची नावे देण्यात आली, त्याचा परिणाम शाळांच्या दैनंदिन कामकाजावर झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे