ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भाजपच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीदिनी उपनगरात अभिवादन

अहमदनगर

सरदार वल्लभभाई पटेलांमुळे भारत देश एकसंघ  – महेंद्र गंधे

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण काम करून आपल्या दृढ संकल्प व मजबूत इच्छाशक्तीने देशाला एकसंघ करणायत मोठे योगदान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या लोह नेतृत्वाने प्रेरित होऊन आज देशाला प्रगतीकडे नेत आहेत. गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारून सरदार वल्लभभाई पटेल यांचा उचित सन्मान मोदींनी केला आहे. आपणही सर्वजण सरदार वल्लभभाई पटेलांचे विचार आत्मसात करून देशासाठी काम करू, असे प्रतिपादन शहर भाजपचे विधानसभा प्रमुख महेंद्रभैय्या गंधे यांनी केले.

भारताचे माजी उप-पंतप्रधान, माजी गृहमंत्री आणि महान स्वातंत्र्यसेनानी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शहर भाजपाच्या वतीने उपनगरातील महेद्र गंधे यांनीपुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी प्रदेश ओबीसी सचिव तुषार पोटे, ज्येष्ठ नेते गोकुळ काळे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, छाया राजपूत, रेखा विधाते, श्रीकांत फंड, सुमित बटूळे, महावीर कांकरिया, लक्ष्मिकांत तिवारी, सुनील सकट, भाग्यश्री कुलकर्णी, वृषाली न्याहळे, श्रीकांत ताके, सिद्धेश नाकाडे, ओम काळे, दितेज पापादेजा, ऋग्वेद गंधे आदी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे