ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अहिल्यानगर मधील श्रमिक नगरमध्ये ‘पोवाड्यांच्या’ ललकारीने शिवजन्मोत्सव साजरा

अहिल्यानगर

भगवा झाला श्रमिक नगर, घुमला शिवरायांचा जयजयकार..

श्रमिक नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

नगरसेवक मनोज दुलम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला नगरसेविका सुनिता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी श्री मार्कंडेय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथा सांगणारे ओघवते पोवाडे सादर केले.विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणामुळे उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले आणि संपूर्ण परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

यावेळी मार्कंडेय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दगडे मॅडम, सर्व शिक्षकवृंद, सोनालीताई दुलम, राजेश पासकटी, सागर यमुन, सागर देवसानी, निखिल दडगे, शुभम बत्तीन, विनायक येमुल, अमित दिकोंडा, सचिन येमुल, गणेश रंगारे, रोहित सरगम, आकाश वग्गा, श्रीकांत गौटला यांच्यासह अखंड श्रमिक नगरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवे ध्वज, फुलांची सजावट आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण श्रमिक नगर परिसर शिवमय झाला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे