ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ह भ प संतदास उर्फ पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना सांस्कृतिक व साहित्य सेवारत्न पुरस्कार २०२५ जाहीर

मुंबई

आम्ही मुंबईकर यां वृत्तपत्र संस्था आणि पत्रकार मुंबई पत्रकार संघाद्वारा,अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणेचे, ह भ प श्री संतदास उर्फ पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य सेवेचा तसेच साहित्य सेवेचा कार्य आढावा घेऊन सांस्कृतिक व साहित्य सेवारत्न पुरस्कार २०२५ देण्याचे पत्र शनिवार दि १९/७/२०२५ रोजी प्राप्त झाले.

हिंगणकर महाराज यांनी आपल्या सामाजिक कार्याचा शुभारंभ १९८७ पासून सिद्धिबेट बचाव तपोवन हटाव यां कैवल्य सम्राट संत श्री ज्ञानेश्वर महाराज यां आळंदीतील जन्मस्थान असलेलं सिद्धिबेट हे प्रायव्हेट संस्थेच्या घशातून काढून शासनाच्या ताब्यात देण्यासाठी अनेक आंदोलने आमरण उपोषण करून सुरवात करून ते आळंदीतील महाज्ञानतीर्थ असलेली इंद्रायणी स्वच्छते साठीही अनेक आंदोलन उपोषण करून शासन दरबारी निदर्शनास आणून दिले तसेच आपल्या साहित्यातून जनजागृती करीत समाज मनाला जागवलं त्यांनी अनेक कविता, अभंग लेखन करून जन जागृती केली तसेच अनेक ठिकाणी वृक्षारोपणही केले.

असे समाज हितैशी कार्य महाराष्ट्रभर आपल्या कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून आणि साहित्याच्या मंचावरून समाज जागृती केली यां बद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार तसेच राज्य पातळीवर ही अनेक पुरस्कार प्राप्त झालेत आज त्या कार्यात मुंबई कराचा हा सांस्कृतिक आणि साहित्य सेवारत्न पुरस्काराची आणखी भर पडली आहे.

पुरस्कार हे मानवाला केवळ घरात शोसाठी किंवा प्रसिद्धीसाठी नसून त्यांना कार्य करण्यास ऊर्जा प्राप्त करून देत असतात किंबहुना कार्य करण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी असतात. ती कार्य चिकाटी कायम राहावी यासाठी ह्या काही संस्था त्या व्यक्तिमत्वाचा कार्य गौरव करीत असतात.

महाराजांचे अभंग निर्झर भाग १, भाग २, तसेच वासुदेव पासष्टी असे तीन ग्रंथ प्रकाशित असून ऑनलाईन तसे १२४ पुस्तके आणि सर्व सोशल मीडियावर अनेक अभंग वाचायला मिळतात असे त्यांचे महाराष्ट्रात मोलाचे योगदान आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे