ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

१ जानेवारीपासून स्वस्त धान्य वाटप बंद

मुंबई

बुलढाणा – स्वस्त धान्य दुकानदारांच्या काही मागण्या आहेत. ज्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. परंतु यावर अद्याप निर्णय होत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने रेशन वाटप बंद करण्याचा इशारा दिला आहे. ही वाटप नवीन वर्षात अर्थात १ जानेवारीपासून केली जाणार आहे.

ऑल इंडिया फेयर प्राईस डीलर फेडरेशन तसेच अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्यावतीने आंदोलन छेडले आहे.

१ डिसेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या, अडचणी समस्यांबाबत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.

दरम्यान ऑल इंडिया फेयर प्राईस ऑफ डीलर फेडरेशनच्या वतीने देशभरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार १ जानेवारीपासून राज्यासह देशभरात स्वस्त धान्याचे वाटप करणार नाही. जोपर्यंत आपल्या मागण्यांच्या संदर्भात सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही, तोपर्यंत राज्यातील व देशातील स्वस्त धान्य दुकाने बंद राहतील.

अस राज्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर म्हटल आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे