ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठी पाट्या लावण्याची मुदत संपली

मुंबई

दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत संपली आहे. अद्याप ज्यांनी दुकानांवर मराठी पाट्या लावलेल्या नाहीत अशांवर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत रविवार २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. तर मनसेने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत शनिवार २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. अद्याप मुंबईतील अनेक दुकानांवर मराठी पाट्या लावल्याचे दिसत नाही. अशा दुकानांवर मुंबई महापालिका प्रशासन कारवाई करणार आहे.

कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने २४ प्रभागांमध्ये ७५ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथकांची नेमणूक केली आहे. महापालिका पाहणी करून ज्यांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे