ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यात लॉजवर सेक्स रॅकेट वर छापा .. तीन महिलांची सुटका

अहिल्यानगर

नेवासा तालुक्यातील खडकाफाटा येथल एका लॉजवर श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला.याठिकाणी स्वतःच्या फायद्याकरीता लॉज मालक व मॅनेजर हे या लॉजमध्ये कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांची सुटका केली असून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की, 29 ऑक्टोबर रोजी अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना खडका फाटा येथील लॉजवर कुंटणखाना सुरु असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी आपल्या कार्यालयातील पो.हे. काँ. दादासाहेब लोंढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो. कॉ. सहदेव चव्हाण यांचे पथक खडका फाटा येथे कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने सायंकाळच्या सुमारास खडका फाट्यावर असलेल्या साई लॉजिंगमध्ये पोलीस पथकाने छापा टाकला.

तिथे लॉज मालक बाळासाहेब भानुदास जाधव (वय 25) रा. मक्तापूर ता. नेवासा व लॉजचा मॅनेजर विकास योगेश ऊर्फ यहुबा औताडे (वय 25) रा. मुकिंदपूर ता. नेवासा हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता महिलांना पुरूष ग्राहकांबरोबर शरीरसंबंध करण्याकरीता रुम उपलब्ध करुन देवून कुंटनखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मुद्देमालासह मिळून आले. यावेळी तीन महिलांची सुटका करण्यात आली.

याबाबत श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस नाईक संदीप संजय दरंदले यांच्या फिर्यादीवरुन लॉज मालक बाळासाहेब भानुदास जाधव व मॅनेजर विकास योगेश ऊर्फ यहुबा औताडे यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 143 सह स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे