ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

साई संस्थानमध्ये देणगीदारांची फसवणूक

शिर्डी

साईसंस्थानच्या देणगी कक्षात देणगीदारांनी दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन एकाच वेळी साईसंस्थान व देणगीदारांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईसंस्थानच्या वतीने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी चौकशी सुरू केली आहे. साईसंस्थानला पाठविण्यात आलेल्या निनावी पत्रामुळे या प्रकारास वाचा फुटली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईसंस्थान प्रशासनाला एक निनावी पत्र पाठविण्यात आले. त्यात देणगी कार्यालयात सुरू असलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. एकच कर्मचारी विशिष्ट पद्धतीने अपहार करत आहे.

दर महिन्याला चार ते पाच लाख रुपयांचा अपहार केला जातो. संस्थान प्रशासनात त्याची कुजबूज सुरू असतानाही कारवाई होत नाही. वृद्ध, अडाणी आणि मध्यस्थांमार्फत आलेल्या देगणीदारांची प्रामुख्याने फसवणूक केली जाते. दिलेल्या रकमेचे दोन भाग करून पावत्या दिल्या  जातात.

त्यातील एक बनावट असते. बनावट पावतीची संस्थानकडे नोंद होत नाही. त्या रकमेचा अपहार केला जातो. विशिष्ट केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे हा प्रकार कुणाच्याही लक्षात येत नाही, असे या पत्रात नमूद केले होते. साईसंस्थानच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, त्यात तथ्य आढळल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे