ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मधील घटना – पैसे परत देण्याच्या बहाण्याने तरुणाकडून अत्याचार

अहिल्यानगर मधे उसने दिलेले पैसे परत देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने १९ वर्षीय विवाहितेला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी दत्तात्रय रघुनाथ ठोकळ (रा. जवखेड, ता. पाथर्डी) याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची शेवगाव तालुक्यातील असून सध्या नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता परिसरात राहते. पीडितेने आरोपी दत्तात्रय ठोकळ याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. हे पैसे परत देण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला माळीवाडा बस स्थानक येथे भेटण्यासाठी बोलावले.

​त्यानंतर आरोपीने पीडितेला स्वतःच्या मोटरसायकलवर बसवून अहिल्यानगर ते पुणे रस्त्यावरील चास शिवारातील एका लॉजवर नेले. तेथे तिचे हात-पाय बांधून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या पतीला मारून टाकीन, अशी धमकीही आरोपीने दिली. ​

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी दत्तात्रय ठोकळ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे