गणपती बाप्पा विशेषब्रेकिंगमहाराष्ट्र
राजकारण्यांनो, तुमचं हिंदू-मुस्लिम सुरू राहू द्या. बारामतीत धर्माच्या भिंती ओलांडून मुस्लिम कुटुंबाने बसवल्या गौराई..
बारामती- एकीकडे अवघ्या देशभरात हिंदू- मुस्लिम असं राजकारण होत असताना शेख कुटुंबाने हिंदू सणांद्वारे हिंदू- मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे. आपण सर्व एक आहोत, कुठलाही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

जाती धर्माच्या भिंती ओलांडून गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना केल्याने बारामतीमधील मुस्लिम कुटुंबाचं कौतुक होत आहे. शेख कुटुंब हे गेल्या आठ वर्षापासून गणपतीची प्रतिष्ठापना करत आहे. गणपतीवर त्यांची श्रद्धा आहे. आता यावर्षी शेख कुटुंबाने गौराई बसवल्या आहेत. त्यामुळे परिसरात त्यांचं विशेष कौतुक होतंय. कुठल्याही जाती आणि धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांनी एकोप्याने राहावं असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.
बारामतीमधील शेख कुटुंब हे कुठल्याही जाती धर्माच्या भेदभावामध्ये न अडकता हिंदू धर्माचा महत्वाचा सण म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
गेल्या आठ वर्षापासून शेख कुटुंब गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून मोठ्या श्रद्धेने गणपतीची आराधना करत आहे. यावर्षी गणपती बाप्पाच्या जोडीला गौराई आली असून त्यांनी पहिल्यांदाच गौराई बसवल्या आहेत. त्यामुळे त्यांचा यावर्षीचा गौरी गणपतीच्या सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे.