ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मंगळवेढा परिसरात घराच्या पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या

सोलापूर

मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथील अनिता हणमंत मोहिते (वय ४०) या महिलेने अज्ञात कारणावरुन तिचे राहते घराच्या पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.

या घटनेची हकीकत अशी, यातील खबर देणारे प्रशांत लवळे (रा.मुढवी) यांना दि.१९ रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या मयत बहिणीचे चुलत दीर कृष्णा मोहिते यांनी फोन करुन सांगितले तुझी बहिण अनिता हिने राहते घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे. हे समजताच खबर देणारे व त्यांची आई पारुबाई दोघेजण मिळून सलगर येथे गेले असता मयत बहिण खाली जमिनीवर उथाणे स्थितीत झोपलेली दिसली.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून ती मयत झाल्याचे सांगितले. खबर देणारे लवळे यांनी माझ्या बहिणीच्या मयताचा तपास होण्याची विनंती पोलीसांना केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे