सोलर सेक्टर चा व्यवसाय सुरू करण्याची नव उद्योजकांसाठी सुवर्ण संधी हा सेमिनार IMS काॅलेज मध्ये मध्ये पार पडला.
अहमदनगर प्रतिनिधी

फ्री सेमिनार सोलर पीव्ही सेक्टर मध्ये उपलब्ध संधी शुक्रवार दिनांक – ८ सप्टेंबर २०२३ रोजी फ्री सेमिनार अहमदनगर मध्ये IMS काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आला होता.
सोलर चा व्यवसाय सुरू करायचा पण या साठी पुणे, औरंगाबाद जावे लागते ट्रेनिंग घ्या, अहमदनगर मध्ये या व्यवसाया साठी जागा , नोकरी शोधा.. त्या पेक्षा नकोच हे क्षेत्र.. असे अनेकांचे प्रश्न उपस्थित असतात.
त्या प्रश्नांची उत्तरे अगदी वेगळ्या पद्धतीने उदाहरण देऊन श्री. प्रशांत दरेकर यांनी उपस्थित असलेल्या MBA च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या सोबत च सोलार क्षेत्रामध्ये करिअर करताना काय काय संधी मिळतात. त्या ची येणाऱ्या काळात किती गरज आहे. यांचे महत्त्व पटवून सांगितले.
श्री दामोदर सर बोलताना म्हणाले की आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात हे सोलर चे सेमिनार तसेच मेन ऑफिस चालू केले आहे. आता अहमदनगर मध्ये ही IMS काॅलेज मध्ये सोलार ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे.
सोलर पीव्ही तंत्रज्ञान हा ( स्किल इंडिया ) अंतर्गत म्हणजे च केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांची माहिती पर ट्रेनिंग देऊन तुम्हाला सोलर पीव्ही सेक्टरमध्ये तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी MITCON कडून विशेष सहाय्य आणि खात्रीपूर्वक प्लेसमेंट समर्थन आणि सहाय्य देण्यात येईल..
सोलर पीव्ही तंत्रज्ञान अभ्यासक्रम –
सोलर पॅनेल, गॅटरी इन्व्हर्टर इ.ची ओळख. , स्टार फोनाईस बॅटरीचे कार्य, बॅटरी, इन्व्हर्टर यांच्या मधील एकसंध समस्यांचे इन्व्हॅटर इन्फिकेशन, डिझाइन, इन्सोलेशन आणि नेट मीटरिंग सोलर पी येथे ऑपरेशन आणि देखभाल, कलर प्रोजेक्ट मॅनेजमेंटने स्टिमेटची गणना तयार केली ही सर्व माहिती दामोदर सरांनी PPT द्वारे मुलांसमोर मांडली.
अधिक माहिती साठी संपर्क करा..
अहमदनगर मिटकॉन कन्सल्टन्सी आणि इंजिनिअरिंग
IMS काॅलेज, चांदनी चौक, स्टेशन रोड, अहमदनगर…
शुभदा थिगळे -74983 45258.