ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बालक मंदिर महिला मंडळ शाळेत विश्व योग दिन साजरा

अहिल्यानगर

21 जून 2025 हे योगदिन साजरा करण्याचे अकरावे वर्ष आहे. बालक मंदिर महिला मंडळ शाळेत यानिमित्ताने त्रिपुरारी योग वर्गाच्या संचालिका सौ. निनाद राजेंद्र ढोरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या योगशिक्षिका सौ.शूळ यांनी आणि योग ग्रुपच्या महिलांनी अनेक योग प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली.

सौ. निनाद ढोरे यांनी योग हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करण्यासाठी कसा महत्त्वपूर्ण आहे हे विशद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दंडस्थितीतील आसने, सूर्यनमस्कार व बैठक स्थितीतील आसने, प्राणायाम ,ओंकार जप यांचे प्रात्यक्षिक केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा . मुख्याध्यापिका सौ. अस्मिता शूळ यांनी केले.यानंतर पर्यावरण दिनानिमित्त “एक पेड़ मॉं के नाम” या शीर्षकांतर्गत शिक्षिका व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे