ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

झिका व्हायरसचा पहिला रूग्ण सापडला

मुंबई

मुंबईकरांची चिंता वाढणार.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासह अनेक साथीचे आजार उद्भवत असतात. त्यात आता झिका व्हायरसची भर पडली आहे. मुंबईत झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे.

मुंबईत चेंबूर येथे झिका विषाणू बाधित रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या एम पश्चिम विभागात एका 79 वर्षीय रूग्णाला झिका व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले.

या रूग्णाला 19 जुलै 2023 पासून ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे होती. यानंतर रूग्णाने खासगी वैद्यकीय उपचार घेतले.

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने झिका रूग्णाबाबतची माहिती दिली होती.

दरम्यान रुग्णावर उपचार करुन त्याला घरी सोडण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे