ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

अहमदनगर प्रतिनिधी - नगरमध्ये आनंदोत्सव

इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी नवा विक्रम केला. ‘चांद्रयान-३’ यशस्वीरित्या चंद्रावर उतरले अन् भारतात एकच जल्लोष करण्यात आला.

अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. नगर शहरासह जिल्ह्यातही या यशाचा आनंद साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ‘चांद्रयान-३’ची यशस्वी चाचणी झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रा. अरविंद शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, योगेश नेमाने, साधना बोरुडे, अमित खामकर, माऊली जाधव, भरत गारुडकर, उमेश धोंडे, विशाल बेलपवार आदी उपस्थित होते.

दरम्यान, भाजपतर्फे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहण्याची सोय हॉटेल अमर पॅलेस येथे करण्यात आली होती. ‘चांद्रयान-३’ यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

यावेळी प्रभारी नवनाथ पडळकर, जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, सचिन पारखी, किशोर बोरा, महेश नामदे, तुषार पोटे, धनंजय जाधव, प्रदीप परदेशी, प्रशांत बोरा, मुयर बोचूघोळ, राजेंद्र सातपुते, नरेंद्र कुलकर्णी, सुहास पाटसकर, विवेक नाईक, वंदना ताठे, शिवाजी दहिहंडे, साहेबराव विधाते, महेश तवले, बाळासाहेब भुजबळ, विशाल खेरे, चंद्रकांत पाटोळे, सुजित खरमाळे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे