ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

ताडोबाच्या नाव लौकिकाला गालबोट…तब्बल १२ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक

चंद्रपूर

सफारी बुकिंग करणार्‍या एजन्सी विरोधात गुन्हा दाखल… 

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंग करणार्‍या एजन्सीने सुमारे १२ कोटी १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन या सफारी बुकिंग करणार्‍या एजन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करार नाम्यानुसार तीन वर्षांमध्ये एकूण २२,८०,६७,००० देय रकमेपैकी केवळ १०,६५,००,००० रकमेचा भरणा या एजन्सीने केला आहे. तर उर्वरित १२ कोटी १५ लाख रुपयांसाठी वारंवार पाठपुरावा करुनही उपयोग झाला नाही.

त्यामुळे एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे