ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

तक्षीला विद्यालयात ‘रंग दे बसंती आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन 

अहमदनगर - नगरमधील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद ... 

अहमदनगर मधील जामखेड रोडवरील तक्षीला विद्यालयात आंतरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन दि. १२ ऑगस्ट २०२३ शनिवारी करण्यात आले.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित होणारा ‘रंग दे बसंती’ उत्सव यावर्षी ‘एकत्वम – प्रतिभाओं का संगम’ या धरतीवर आधारित होता.

संपूर्ण अहमदनगर शहरातील २० शाळांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. ही स्पर्धा बालवाडीच्या गटापासून इयत्ता १०वी पर्यतच्या विद्यार्थासाठी घेण्यात आली.

विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व विविध कलागुणांना वाव मिळावा त्यासाठीच तक्षिला विद्यालयाने ही संधी , हक्काचे व्यासपीठ निर्माण केले. यातुन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हा उद्देश शाळेचा असून हा उपक्रम स्तुत्यच आहे . या उपक्रमात विविध शाळांतील ७५० विद्यार्थी व शिक्षकांनी हजेरी लावली. स्पर्धां मधे सहभागी होऊन बक्षिसांची लयलूट ही केली.

या स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी शाळेच्या मुख्याधापिका सौ. जयश्री मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाने विविध स्पर्धा जसे फॅन्सी ड्रेस( वेशभूषा), समूह गायन, समुह नृत्य व वैयक्तिक गीत, स्पेलर चॅम्प्स, मोनोऍक्ट, टिशु पेपर आर्ट, मंडला आर्ट तसेच फुटबॉल, लघुनाटीका आणि टेक इंडिया , डिजी मेनिया , डिजिटल  क्रिएटीव्हीटी  यांसारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले गेले. त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धेच्या निर्णया साठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ञ व पारखी परीक्षकांना आमंत्रित करण्यात आले. वेळेचे बंधन ठेवत एकाच वेळी सर्व स्पर्धाचे नियोजन होते.

स्पर्धेची सुरुवात सकाळी नऊ वाजता होऊन सर्व शाळा शिक्षक व विद्यार्थाचे स्वागत, परिक्षक परिचय व सन्मान झाल्यावर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली. मध्यांतरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती व स्पर्धेनंतर लगेचच निकाल जाहिर करण्यात आला.

यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली . सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.

अशा प्रकारे हसत-खेळत आनंदाच्या वातावरणात स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील समन्वयक श्री. तन्वीर खान , कोमल विजन, वासंती तिरमल, अनिता मंत्री तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लागले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे