ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

प्रामाणिक परिश्रम केल्यास फळ निश्चित मिळते – सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा

अहिल्यानगर

दि अहमदनगर प्रेस अँड अलाईड ऑनर्स असो. च्या उपाध्यक्षपदी विनय गुंदेचा यांची निवड झाल्या बद्दल सन्मान..

दि अहमदनगर प्रेस अँड अलाईड ऑनर्स असोशियन अहिल्यानगर च्या उपाध्यक्षपदी उद्योजक विनय गुंदेचा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संवाद प्रतिष्ठान अहिल्यानगर चे सचिव श्रीनिवास बोज्जा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संवाद प्रतिष्ठानचे नरेश कांबळे ,संजय भालेराव, आदिनाथ भोसले, संजय सायगावकर, रवींद्र काळे, रवींद्र लोखंडे, गोवर्धन जाधव,कुलकर्णी साहेब व गणेश दाणे आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना श्रीनिवास बोज्जा म्हणाले विनय गुंदेचा यांचे कार्य कौतुकास्पद असून कमी वयात त्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव लौकिक केले असून सामाजिक बांधिलकी या नात्याने त्यांनी संवाद प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य निस्वार्थ पणे केलेले आहे म्हणूनच त्यांच्या कामाची व कार्याची पावती म्हणूनच त्यांची असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली, प्रामाणिक परिश्रम केल्यास फळ निश्चित मिळते याचेच एक उदाहरण आहे.

या वेळी सत्काराला उत्तर देताना विनय गुंदेचा म्हणाले माझी उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने माझी जबाबदारी वाढली असून मी असोसिएशन च्या प्रत्येक सभासदास न्याय मिळवून देण्यासाठी व असोसिएशन च्या माध्यमातून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करेल, माझा आजचा सन्मान नक्कीच माझी ऊर्जा वाढण्यास मदत होईल.

या वेळी कार्यक्रमाचे स्वागत नरेश कांबळे यांनी केले तर आभार आदिनाथ भोसले यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भालेराव यांनी केले या वेळी संवाद प्रतिष्ठान चे इतर सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे