अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, काका ट्रस्ट आणि ‘आय लव्ह नगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात पार पडले.
अहिल्यानगर

माणुसकीच्या नात्याने एकत्र येत, अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, काका ट्रस्ट आणि ‘आय लव्ह नगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात पार पडले.

या प्रेरणादायी उपक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, तर या शिबिराचे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधला.
प्रत्येक नागरिकाने आपला वाढदिवस किंवा विशेष प्रसंग रक्तदान करून साजरा केला, तर देशातील रक्ताचा तुटवडा कायमचा दूर होऊ शकतो. मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता समाजाशी नाळ जोडत सुरू केलेली ही सामाजिक चळवळ अत्यंत कौतुकास्पद आहे.

या महायज्ञात महिला, तरुण वर्ग आणि दिव्यांग बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन नवा आदर्श घालून दिला. रक्ताअभावी कोणाचाही जीव जाऊ नये ही आपली सामाजिक जबाबदारी असून, हाच विचार घेऊन ही रक्तदान चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात अखंडपणे पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे.
या प्रसंगी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे, महिला बालकल्याण सभापती दिपाली बारस्कर, असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष अजित जगताप, जिल्हाध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष गोरख पडोळे, अमित बुरा यांच्यासह सर्व पदाधिकारी, महायुतीचे नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

रक्तदान करणाऱ्या सर्व देवदूतांचे मनापासून आभार व आयोजकांना पुढील सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!




