ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

टोल नाक्या जवळ कोयता घेऊन दहशत करणारे दोघे जण पोलिसांच्या ताब्यात

अहिल्यानगर

अहिल्यानगर  शहरातील बाह्यवळण रस्त्यावरील टोलनाक्याजवळ हातात लोखंडी धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी (ता. १६) ताब्यात घेतले.

या कारवाईत एका संशयिताकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. प्रितिम भाऊसाहेब लाळगे (वय २४, रा. दांगटमळा, चेतना कॉलनी, नवनागापूर, वडगाव गुप्ता, ता. जि. अहिल्यानगर) आणि नकुल विठ्ठल पवार (वय २६, रा. जेऊर बायजाबाई, न्हावी गल्ली, ता. जि. अहिल्यानगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बाह्यवळण रस्त्यावरील टोलनाक्याजवळ दोघेजण हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता त्यापैकी एका व्यक्तीकडून लोखंडी धारदार कोयता मिळून आला. पोलिसांनी हा कोयता जप्त केला असून, दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील सार्वजनिक ठिकाणी शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे