ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर मधील अल्पवयीन मुलीवर (वय 17) वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (15 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश सुरेंद्र जैस्वाल (रा. विळद, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

हा प्रकार ऑक्टोबर 2025, मार्च 2026 तसेच 2 ऑगस्ट 2026 रोजी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहतात. त्यांची मुलगी अल्पवयीन असून, संशयित आरोपीने तिला वारंवार घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरूध्द अत्याचार केल्याचा आरोप आहे.

विळद येथील हॉस्पिटलच्या गेटजवळ, एका हॉटेलजवळ तसेच एका लॉजिंग परिसरात 2 ऑगस्ट रोजीही हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी 15 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक कौटे पुढील तपास करीत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे