ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कॉलेज तरुणीचा पाठलाग करणाऱ्या सावेडी परिसरातील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर

कॉलेजला जाताना आणि घरी येताना एका तरुणीचा सतत चोरून पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या एका विकृत तरुणाविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सावेडी उपनगरातील निर्मलनगर परिसरात घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ​

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच कॉलेजमध्ये शिकणारा आरोपी सागर संजय टोकेकर (रा. केडगाव देवी, शिवाजीनगर) हा गेल्या काही दिवसांपासून या तरुणीवर पाळत ठेवत होता.

पीडितेने त्याला अनेकदा बजावून देखील त्याने तिचा पाठलाग करणे थांबवले नाही. डिसेंबर महिन्यापासून आरोपीने तरुणीच्या घरासमोर मोटारसायकलवरून येऊन तिला हातवारे करणे आणि तिचा पाठलाग करणे सुरूच ठेवले होते.

​दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी आरोपी पुन्हा तरुणीच्या घरासमोर आला आणि त्याने तिला आवाज देऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला. या सततच्या त्रासामुळे आणि छेडछाडीमुळे पीडित तरुणीने अखेर धाडस दाखवून तोफखाना पोलीस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली.

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ (२) नुसार आरोपी सागर टोकेकर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गोसावी करत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे