ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात क्रिकेटच्या वादातून युवकाला मारहाण

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील पिंजार गल्ली, पीरशहा खुंट परिसरात क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी (5 एप्रिल) रात्री घडली. आपान जावेद शेख (वय 18, रा. पिंजार गल्ली, पीरशहा खुंट) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जखमी आपान याची आई नाजमीन जावेद शेख (वय 36) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अफजान जावेद शेख व झैद जावेद शेख (दोघे रा. पिंजार गल्ली, पीरशहा खुंट) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपान हा आपल्या मित्रांसह आडते बाजार परिसरातील लाईट डीपीजवळ क्रिकेट खेळत होता. त्याचवेळी खेळताना अफजान शेख व झैद शेख यांच्यासोबत त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, दोघांनी आपानच्या डोक्यावर लाकडी बॅटने वार केला तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.कायदेशीर मदत

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ आपान याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. आपानची आई नाजमीन यांनी पतीसह कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, अफजान शेख व झैद शेख यांच्याविरूध्द फिर्याद दाखल केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे