ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

यंग मेन्स ज्युदो असोसिएशनच्या वतीने फिटनेस कॅम्पचे आयोजन जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या कॅम्पमध्ये सहभागी व्हावे अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव यांचे आवाहन

अहमदनगर

मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी यंग मेन्स ज्युदो असोसिएशनच्या वतीने दि.०४ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ८ ते १६ वर्ष या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी फिटनेस कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ मार्गदर्शकांच्या प्रशिक्षणात यंग मेन्स ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव व सचिव प्रा.संजय धोपावकर यांच्या संकल्पनेतून बंधन लॉन जवळील हॉटेल क्रिष्णा एक्जोटिका येथील मैदानात फिटनेस कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.या कॅम्पमध्ये ज्युदो, कुस्ती, कुराश,लाठी काठी,योगा,रोप,मल्लखांब,जिम्नॅस्टिक व घोडेस्वारी इ. खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन यंग मेन्स ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव आणि सचिव प्रा.संजय धोपावकर यांनी केले आहे.

शिबिराच्या अधिक माहितीसाठी

गणेश लांडगे-९२२५५६६४५८,

भूषण घाटविसावे-७५१७५०५०३१,

आदित्य धोपावकर-८४४६८०८३२१

यांच्याशी संपर्क साधावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे