ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राहुरी पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर

अहिल्यानगर

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कार्डिले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून अक्षय त्यांचे चिरंजीव आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून शिवाजीराव कर्डिले यांचे ओळख होती.

गेल्यावर्षी 17 ऑक्टोबर रोजी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शिवाजीराव कर्डिले हे ‘राजकारणातील किमयागार’ म्हणून ओळखले जात होते. कोणत्याही लाटेत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही प्रमुख पक्षांतून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. राहुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग अनेक वर्षे आपले वर्चस्व कायम राखले होते.

कर्डिले केवळ राजकारणी नव्हते, तर सहकार क्षेत्रातील त्यांचा दबदबा मोठा होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विकासकामांना गती दिली. ‘सामान्यांचा माणूस’ ही त्यांची ओळख शेवटपर्यंत कायम राहिली. कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यात आणि विरोधकांना चकित करण्यात त्यांचा हातखंडा होता.

नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. साध्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला हा प्रवास विधानसभेपर्यंत पोहोचला.

शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले.

शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे