ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस उलटली..नगर – मनमाड महामार्गावरील घटना

अहमदनगर

अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जात असताना ही बस उलटली. सुदैवाने या अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झालेत. तसंच कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमध्ये शालेय सहल घेऊन निघालेली बस उलटली. अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोली फाटा येथे ही घटना घडली. अहमदनगर – मनमाड महामार्गावर भरधाव वेगात असलेली ही बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

राहुरी येथून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन ही खासगी बस निघाली होती. पण अहमदनगर – मनमाड महामार्गावर चिंचोली फाटा येथे पिकअपने हुलकावणी दिल्याने अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये उलटली. या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर स्थानिक नागिरकांनी तात्काळ मदतकार्य करत विद्यार्थ्यांना बसच्या बाहेर काढले. या अपघातामध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे