ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पैसे दुप्पटच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक

अहिल्यानगर पोस्ट ऑफिसमधील फिक्स डिपॉझिट व विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतील, असे आमिष दाखवून कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथील शेतकर्‍यासह गावातील 40 ते 50 नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुखदेव दगडू ठोकळ (वय 53, रा. कामरगाव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बबन साहेबराव शेलार (मुळ रा. गुंफा, भातकुडगाव, ता. शेवगाव, सध्या रा. फत्तेपुर, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

बबन शेलार याने 6 जुलै 2024 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत कामरगाव पोस्ट ऑफिस येथे फिर्यादी सुखदेव ठोकळ व इतर नागरिकांचा विश्वास संपादन केला.

शेलार याने पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट व इतर योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट होईल, असे सांगून फिर्यादीकडून नऊ लाख रूपये घेतले. मात्र या रकमेच्या बदल्यात बनावट नोंदी करून विश्वासघात केला व आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

सदर प्रकरणाची माहिती ठोकळ यांनी अहिल्यानगर तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी बुधवारी (28 जानेवारी) सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे करीत आहेत.

दरम्यान, संशयित आरोपीने आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता अधिकृत शासकीय योजनांची खातरजमा करूनच गुंतवणूक करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे