ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे मकर संक्रांत व रथ सप्तमी निमित तिळगूळ व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

सोलापूर

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने मकर संक्रांत निमित्त तिळगूळ व हळदीकुंकू कार्यक्रम कलावती श्रीपती यांचे अध्यक्षतेखाली व श्रीदेवी मिठ्ठापल्ली, अरूणा कन्ना, संगीता इंदापुरे, भारती सग्गम यांचे प्रमुख उपस्थितीत तिळगुळ हळदी कुंकू कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले. प्रथम सर्व उपस्थित मान्यवरांचे अरूणा कन्ना यांनी स्वागत केले.

त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण सर्व मान्यवरांचे शुभहस्ते करण्यांत आले. भारती सग्गम यांनी भाषणांत सावित्रीबाई फुले आद्य शिक्षिका यांच्या मुळेच महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यामुळे आज महिला सक्षम होत आहेत.

तसेच मकर संक्रांंतीमध्ये तिळगूळ आणि हळदीकुंकू कार्यक्रम करण्यामागचे उद्देश शात्रीय दृष्टीकोनातून महत्वाचे असल्याचे सांगितले.यावेळी संगीता इंदापुरे यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेनां संपूर्ण पाठिंबा दिले त्यामुळे सावित्रीबाई समाजात कार्यात यशस्वी झाले.तसेच पुरूषांच्या सहकार्याने महिलांनी ही समाज कार्य करण्यास प्रवृत्त व्हावे असे सांगून स्रीशक्तीचा जागर करण्याचा प्रयत्न केले.

या कार्यक्रमांस वरलक्ष्मी पल्ली, आद्या मिठ्ठापल्ली,सावित्री कमटम,प्रणोती संगा,राजश्री बेनगिरी,रेणुका पासकंटी, मंजूश्री वल्लाकाटी, वैशाली यनगंदूल,ममता बोलाबत्तीन, वासंती कोंडाबत्तीन, रंजना मद्दा, वरलक्ष्मी गोटीपामुल, विजयालक्ष्मी गंधमल, विमल बुरा, सुवर्णा चलमेटी,शांता भुदत्त,रंजना उपलंची आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर सर्व महिला एकमेकांना हळदीकुंकू लावून वाण व पानसुपारी आणि तिळगूळ तसेच लेखणीसाठी पेन दिले.कार्यक्रमास सुत्रसंचलन भारती सग्गम यांनी केले तर आभार श्रीदेवी मिठ्ठापल्ली यांनी मांडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे