ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

भिंगारमध्ये दगडफेक, तोडफोड पूर्ववैमनस्यातून दोन गटात राडा

अहिल्यानगर

​अहिल्यानगर  मधील  भिंगार येथील वडारवाडी भागात दोन गटात राडा झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी घडली.

पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात सहा जणांच्या टोळक्यांने दगडफेक, तोडफोड, मारहाण केली. याप्रकरणी अनिल दत्तू डोकडे ( रा. वडारवाडी, भिंगार, जि. ता. अहिल्यानगर ) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संदीप तागडकर, प्रीतम तागडकर, सोमेश तागडकर, ऋषीकेश तागडकर, स्वप्नील तागडकर आणि सुरज तागडकर सर्व ( रा. वडारवाडी, भिंगार, जि. ता. अहिल्यानगर ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी अनिल दत्तू डोकडे १८ जानेवारी रोजी रात्री काम संपवून घराकडे जात असतांना म्हस्के रुग्णालयाजवळ आरोपींनी त्यांना अडवले. वरील आरोपीसह त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि जमावाने दगडफेक केली. ​

या दगडफेकीत अनिल डोकडे आणि त्यांचे मित्र संजय धोत्रे हे दोघेही जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आरोपींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. ​भिंगार पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे आणि मारहाण केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार दहीफळे करत आहेत.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे