ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी, कसं डाउनलोड करायचं ?

अहिल्यानगर

दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी आता दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १९ जानेवारी रोजी दहावीचे हॉल तिकीट जारी केले आहे. दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. त्याआधी बोर्डाने mahahsscboard.in आणि mahahsscboard.maharashtra.gov.in

या वेबसाइटवर हॉल तिकीट जारी केले आहेत. हे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करु शकतात. हे हॉल तिकीट डाउनलोड करुन विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. शाळेकडून विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट दिले जाणार आहे.

हॉल तिकीट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. शाळेकडून हॉल तिकीट दिले जाणार आहे.

या हॉल तिकीटावर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे. जर सही, शिक्का नसेल तर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही.

● सर्वात आधी mahahsscboard.in या वेबसाइटवर जायचे आहे.

● यानंतर तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये एसएसएसी या पर्यायावर निवडायचे आहे.

● यानंतर Login for Institute येईल. तिथे शाळांनी लॉग इन करायचे आहे.

● यानंतर Sign in Here वर क्लिक करा.

● यानंतर तुमचं Username आणि पासवर्ड टाकून सबमिट करा.

● यानंतर रोल नंबर टाकून एसएससी हॉल तिकीट डाउनलोड करा. या हॉल तिकीटची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे