ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

द्वारकाधीश कॉलनीतील कुटुंबावर जीवघेणा हल्ला

अहिल्यानगर

भिंगार परिसरातील आलमगीर येथील द्वारकाधीश कॉलनीतील एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात निखिल देवीराम धुलिया ( रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार जि. ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी नरेंद्र गजानन कनोजिया, पारस गजानन कनोजिया, ऋतिक धीरज परदेशी, ज्योती गोपीचंद कनोजिया, ममता अजय परदेशी आणि सागर उर्फ विकी गोपीचंद कनोजिया सर्व ( रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार जि. ता. अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून वरील आरोपींनी कुटुंबावर बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला केला. आरोपींनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करून फिर्यादीच्या आई-वडिलांना आणि बहिणीला बेदम मारहाण केली.

यावेळी पारस कनोजिया याने ‌’तुला कायमचा संपवतो‌’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे