ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात माळीवाडा परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

शहरातील माळीवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकात धंद्याच्या वादातून राडा झाल्याची घटना घडली. लोखंडी फायटरने तरुणावर हल्ला केला.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अनिल रमेश आरडे ( रा. शिंदे गल्ली, माळीवाडा, जि. ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद साठे, अभिजित साठे, प्रशांत साठे सर्व ( रा. माळीवाडा, जि,. ता. अहिल्यानगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अनिल रमेश आरडे यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते शिवम सायकल दुकानाच्या ओट्यावर बसलेले असताना, ओळखीचा प्रमोद दिनकर साठे तेथे आला. ‌’आमच्या धंद्याकडे का येतो?‌’ असे म्हणत त्याने आरडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच अभिजित साठे, प्रशांत साठे आले. यावेळी प्रशांत साठेने हातातील लोखंडी फायटरने आरडे यांच्या डाव्या डोळ्यावर प्रहार केला.

तसेच इतर दोघांनी त्यांना लाथाबुक्क्‌‍यांनी बेदम मारहाण केली. आरडाओरडा झाल्याने स्थानिक नागरिक मदतीला धावून आले असता, तिन्ही आरोपी तेथून पळून गेले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार औटी करत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे