ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पालवी शिशुविहारच्या वतीने विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन

अहिल्यानगर

प्रोफेसर चौक येथील परिवर्तन प्रतिष्ठान संचलित पालवी शिशुविहार येथे येत्या 23 जानेवारी रोजी वसंत पंचमी अर्थात सरस्वतीमाता प्रकट दिनाचे औचित्य साधून विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या संस्कार सोहळ्यासाठी चार वर्ष पूर्ण झालेल्या बालकांना नाव नोंदणी करता येणार असल्याचे पालवी शिशुविहारच्या संचालिका सौ. मुग्धा घोटणकर यांनी सांगितले.

बासर येथील एकमेव सरस्वती मंदिरात केला जाणारा हा संस्कार अहिल्यानगर शहरात करता येणार आहे. भारतीय संस्कृतीतील सोळा संस्कारांपैकी एक असलेला हा संस्कार औपचारिक विद्या ग्रहण करण्याची सुरवात करण्यासाठी केला जातो. सरस्वतीच्या आशीर्वादाने आणि आईच्या मांडीवर बसून केला जाणाऱ्या या संस्काराचे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्व सांगितले आहे.

सदर सोहळा 23 जानेवारी, शुक्रवार रोजी पालवी शिशुविहारच्या प्रांगणताच संपन्न होणार असून या संस्कार सोहळ्यासाठी जास्तीत जास्त नावनोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन पालवी शिशुविहारच्या प्रधानाचार्या सौ. स्वाती खिस्ती तसेच व्यवस्थापिका सौ. मानसी देशपांडे यांनी केले आहे.

सदर उपक्रमाविषयीच्या अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणी साठी 9011568567 या क्रमांकावर संपर्क करण्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे