शिक्षणा बरोबरच विदयार्थ्याची आरोग्याची काळजी घेणे कौतुकास्पद- मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा
बोल्हेगाव येथील किड्स स्कुल मध्ये मोफत आरोग्य शिबीर संपन्न

नगर येथील प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सभापती मनपा अहिल्यनगरचे मा. श्री. कुमारभाऊ वाकळे, उद्योजक मा. श्री. बाबुशेठ नागरगोजे, मा. नगरसेविका सौ. विनाताई बोज्जा, संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, डॉ.भीबीशन मिसाळ,डॉ. अनिकेत यादव डॉ. वर्षा धापटकर, संस्थेचे कोषध्यक्ष श्री. संदिप गांगर्डे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलतांना सौ. विनाताई बोज्जा म्हणाले किड्स सेकंड होम स्कुल मध्ये विदयार्थ्यांना शिक्षणा बरोबरच अध्यात्मिक शिक्षण ही दिले जाते, या मुळे विदयार्थ्यांना मध्ये चांगले गुण प्रस्थापित होतात. प्रत्येक वेळेस शाळेत मोफत आरोग्य शिबीर ही घेतली जातात ही कौतुकास्पद गोष्ट असून इतर शाळांनाही हे गुण अंगी करावे असे आवाहन केले.
या वेळी बोलतांना कुमार भाऊ वाकळे म्हणाले बोल्हेगाव मध्ये किड्स सेकंड स्कुल ने आपले नाव लौकिक केले असून या शाळेमध्ये मोठया प्रमाणात विदयार्थी शिक्षण घेत आहेत, या शाळेत विध्यार्थी साठी पोषक असे वातावरण निर्मिती केली जाते ही महत्वाची बाब आहे.
कार्यक्रमाचे सुरुवातीस प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमा नंतर डॉ.भीबीशन मिसाळ,डॉ. अनिकेत यादव व डॉ. वर्षा धापटकर यांनी सर्व विदयार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी करून औषधे ही देण्यात आली.प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले.
पाहुण्यांचेस्वागत मुख्याधपिका सौ. संगीता गांगर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. दिपाली हजारे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना भाटे यांनी केले. या वेळी विदयार्थी व पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. रुपाली जोशी,सौ. अर्चना चव्हाण,सौ. अर्चना भाटे,सौ. अनिता गायकवाड,सौ. सुनंदा गाडे,सौ. लीना काळे,शाळा व्यवस्थापक श्री. शुभम होले सर आदींनी परिश्रम घेतले.




