ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आता जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत, अर्ज कोठे, कसा करायचा?

अहिल्यानगर

एकाच कुटुंबातील पोटहिश्श्याची मोजणी आता फक्त ९० दिवसांत होणार आहे. त्यासाठी अवघे २०० रुपयेच लागणार आहेत.

शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या मोजणीसाठी अर्ज करताना कुटुंबातील सर्वांची संमती बंधनकारक असेल. यापूर्वी वडिलोपार्जित पोटहिस्सा मोजणीसाठी १ हजार रुपये ते १४ हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत होता. मात्र आता पोटहिस्सा मोजणीसाठी केवळ २०० रुपये खर्च येणार असून हा निर्णय राज्यभर लागू करण्यात आला आहे. पण यासाठी अर्ज कुठे करावा लागणार? कसा अर्ज कराल? कागदपत्रे कोणती लागणार? याबाबत जाणून घेऊयात..

जमिनीचा बांध आणि जागेच्या हद्दीतून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक जिल्ह्यात सरासरी वर्षाला ५०० ते ६०० गुन्हे दाखल होतात. हे वाद कायमचे मिटवण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने जमिनीच्या मोजणीसाठी फक्त दोनच प्रकार ठेवले आहेत.

३० ते ९० दिवसांत अर्जदारांची जमीन मोजून दिली जाते. त्यापैकीच पोटहिश्श्याच्या जमिनीची मोजणीचाही निर्णय घेतलाय. ही मोजणी फक्त २०० रूपयात होणार आहे. त्यासाठी तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील जमिनीच्या नियमित मोजणीसाठी हेक्टरी २००० रुपये मोजावे लागतात. तर शहरी हद्दीतील तेवढ्याच जमिनीच्या मोजणीसाठी १००० रुपये जादा द्यावे लागतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे