ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अहिल्यानगर सावेडीमध्ये जानेवारीत रंगणार सावित्री ज्योती महोत्सव.

अहिल्यानगर

विविध कार्यक्रमांसह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश.. बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठे मिळावी, युवकांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी आणि विविध कार्यक्रमांसह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असलेल्या चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सवाचे शहरात आयोजन करण्यात आले आहे.

हे महोत्सव व बचत गट स्टॉल वस्तू विक्री प्रदर्शन सावेडी येथील गुलमोहर रोड कोहिनूर मंगल कार्यालयात दि. १५ ते १८ जानेवारी येथे घेण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक जय युवा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष ड. महेश शिंदे व विशेष सरकारी वकील ड. सुरेश लगड यांनी दिली.

अहिल्यानगर महानगरपालिका, जय स्वयंसेवी संस्था संघटना, क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत आदींच्या माध्यमातून हा महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवाचे हे दहावे वर्ष आहे. महोत्सवामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, दंत तपासणी, मोतीबिंदू शास्त्रीय शिबिर, सर्व जातीय वधू-वर मेळावा, वक्तृत्व, नृत्य, चित्रकला, उखाणा, भजन, हस्ताक्षर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, ब्युटी टॅलेंट शो, सामाजिक संस्थांना मार्गदर्शन, बेटी बचाव बेटी पढाव, आहार मार्गदर्शन, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान, राष्ट्रीय युवा सप्ताह, स्वामी विवेकानंद जयंती, सावित्री ज्योती गौरव पुरस्कार, कवी संमेलन, लोककला सादरीकरण असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.

महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी बचत गट स्टॉल धारकांनी जुन्या कोर्टाच्या पाठीमागे टांगे गल्ली, पावन गणपती मंदिराशेजारी संस्थेच्या संपर्क कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महोत्सव संयोजनासाठी ड. दिनेश शिंदे, मीनाताई म्हसे, तुषार रणनवरे, ड. प्रशांत साळुंके, जयश्री शिंदे, अश्विनी वाघ, गणेश बनकर, रावसाहेब काळे, बाबू काकडे, सुनील मतकर, मेजर भीमराव उल्हारे, कल्याणी गाडळकर, पोपटराव बनकर, शाहीर कान्हू सुंबे, रावसाहेब मगर, विनोद साळवे, स्वाती डोमकावळे, अॅड. पुष्पा जेजुरकर, अॅड. आरती शिंदे, प्रतिभा गांधी, मनीषा शिंदे आदी प्रयत्नशील आहे.

अधिक माहितीसाठी ९९२१८१००९६ व ९६५७५११८६९ या क्रमांकावर संपर्क साधावा..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे