ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उद्यापासून सुट्टी …

पण शिक्षकांना मे महिन्यात ही शाळेत यावे लागणार

शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उद्यापासून म्हणजेच 26 एप्रिल 2025 पासून शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागणार आहेत. मात्र शिक्षकांना मे महिन्यात सुद्धा काही दिवस शाळेत यावे लागणार आहे.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय शिक्षकांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर आज शालेय विद्यार्थ्यांचा चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राचा शेवटचा पेपर आहे. चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 आज संपणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा आज 25 एप्रिल 2025 रोजी समाप्त होतील आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजेच 26 एप्रिल पासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत.

खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात होता आणि यंदा उन्हाळी सुट्ट्या उशिराने का लागत आहेत यामुळे नाराजी पाहायला मिळत होती.

वाढत्या तापमानामुळे पालक चिंतेत होते मात्र आता पालकांची ही चिंता दूर होणार आहे कारण की उद्यापासून विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागणार आहेत. मात्र असे असले तरी शालेय शिक्षकांना मे महिन्यात सुद्धा शाळेत यावे लागणार आहे.

उद्यापासून शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी लागू होईल आणि शिक्षकांची उन्हाळी सुट्टी 6 मे 2025 पासून सूरु होणार आहे. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षात शाळेला कधी सुरुवात होणार, उन्हाळी सुट्ट्यानंतर शाळा कधी सुरू होणार याबाबत सुद्धा मोठी माहिती समोर येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे