ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल.. नगर शहरातील सिव्हील इंजिनीअरला ९ लाखाला गंडवले

अहिल्यानगर

मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव करून, शहरातील एका ५१ वर्षीय सिव्हील इंजिनीअरला ९ लाखाला गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी सावेडी परिसरात राहणाऱ्या इंजिनीअरला ‘राज आनंद’ या नावाने ब्लू डार्ट सर्व्हिसकडून व्हॉट्सअॅपवर कॉल आला. ‘तुमच्या नावाने अवैध पार्सल पाठवले जात आहे. ‘तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे’, असे भितीदायक संदेश पाठवून घाबरवण्यात आले.

भामट्यांनी इंजिनीअरला ‘विजय पाल’ नावाच्या दुसऱ्या नंबरवर व्हीडीओ कॉल करून, ‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झाला आहात’ असे सांगितले. ‘तुमचे बँक खाते चौकशीसाठी तपासावे लागेल’ अशी खोटी माहिती देऊन, इंजिनीअरच्या खात्यातील ९ लाख रुपये दुसऱ्या खात्यावर हस्तांतरित करायला भाग पाडले.

२४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. पैसे परत न मिळाल्याने ३१ ऑक्टोबर रोजी इंजिनीअरने सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

सायबर पोलीस ठाण्यात राज आनंद आणि विजय पाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पैदाम करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे